मुरघास म्हणजे मुरलेला चारा (घास). अगदी आपल्या मुरांबा किंवा मोरावळ्या सारखा. हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश ना होऊ देता किमान ४५ दिवस हवाबंद करून वेगवेगळ्या मार्गांनी साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय. लोणचे किंवा मोरावळा दीर्घकाळ टिकविण्यासाठी जे पिढ्यानं पिढ्या चालत आलेले मूलभूत तंत्रज्ञान वापरले जाते, तसेच काहीसे तंत्रज्ञान मुरघास बनवताना हि लागते. मुरघासाला इंग्लिश मध्ये silage सायलेज असे म्हणतात.